Loksabha 2019 : योगींच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस उतरविणार 'हा' उमेदवार

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 एप्रिल 2019

योगी आदित्यनाथ यांच्याऐवजी भाजपने अभिनेते रवी किशन यांना उमेदवारी दिली आहे. पण पक्षाचा हा निर्णय योगी आदित्यनाथ यांना मान्य नसल्याची चर्चा आहे. किंबहुना, रवी किशन यांचा अर्ज दाखल करतानाही योगी आदित्यनाथ गैरहजर होते. योगी आदित्यनाथ यांची नाराजी गोरखपूरमध्ये भाजपला भोवणार का, अशी चर्चा राजकीत वर्तुळात त्यानंतर सुरू झाली. 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील सर्वांत 'हायप्रोफाईल' मतदारसंघ मानला जात असलेल्या गोरखपूरमधून काँग्रेसने मधुसूदन त्रिपाठी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा बालेकिल्ला आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर आदित्यनाथ यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. पोटनिवडणुकीमध्ये ही जागा भाजपला गमवावी लागली होती. त्यामुळे आता ही जागा पुन्हा जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. 

योगी आदित्यनाथ यांच्याऐवजी भाजपने अभिनेते रवी किशन यांना उमेदवारी दिली आहे. पण पक्षाचा हा निर्णय योगी आदित्यनाथ यांना मान्य नसल्याची चर्चा आहे. किंबहुना, रवी किशन यांचा अर्ज दाखल करतानाही योगी आदित्यनाथ गैरहजर होते. योगी आदित्यनाथ यांची नाराजी गोरखपूरमध्ये भाजपला भोवणार का, अशी चर्चा राजकीत वर्तुळात त्यानंतर सुरू झाली. 

रवी किशन यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते तगड्या उमेदवाराच्या शोधात होते. 'गोरखपूरमधून काँग्रेसच्या निष्ठावंताला उमेदवारी द्यावी', अशी मागणीही जोरात होती. इच्छुकांच्या यादीत सिद्धार्थ श्रीवास्तव यांचे नाव आघाडीवर होते. पण त्रिपाठी यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले. गोरखपूरमधून समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष युतीतर्फे रामभुआल निषाद निवडणूक लढवित आहेत.

Web Title: Congress fields Madhusudan Tiwari from Gorkhpur for Lok Sabha 2019 polls