
तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी खराब झाली असली, तरी पाच राज्यांतील 6 जागांवर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसनं चांगली कामगिरी केलीये.
Assembly Election : नागालँड 0, त्रिपुरा 3, मेघालय 5..; निवडणुकीत काँग्रेसचा 'फ्लॉप शो' सुरूच!
Assembly Election 2023 : निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) 'फ्लॉप शो' सुरूच आहे. एकापाठोपाठ एक पराभव स्वीकारावा लागत आहे.
ईशान्येकडील तीन राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकाही काँग्रेससाठी वाईट बातमी घेऊन आल्या आहेत. सुरुवातीच्या निकालानुसार नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची वाईट स्थिती आहे. या निवडणुकीत काँग्रेस चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. मात्र, तसं काहीच झालं नाही.
काँग्रेसला यावेळी नागालँडमध्ये (Nagaland Assembly Election) आपलं खातंही उघडता आलं नाही, तर भाजप आघाडी राज्यात पुन्हा एकदा आपलं सरकार स्थापन करत असल्याचं दिसत आहे. त्रिपुरामध्ये काँग्रेसनं डाव्यांशी आघाडी करून निवडणूक लढवली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.
काँग्रेसला इथं तीन जागांवर विजय मिळताना दिसत आहे. त्याचवेळी मेघालयमध्ये काँग्रेसची सर्वात वाईट कामगिरी पाहायला मिळाली. गेल्या निवडणुकीत काँग्रेसनं इथं तीन डझनाहून अधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र, यावेळी ते केवळ पाच जागांवरच मर्यादित असल्याचं दिसून येत आहे.
निवडणूक आयोगाच्या (Election Commission) संकेतस्थळानुसार, नागालँडमध्ये काँग्रेसला सुमारे 4 टक्के मतं मिळत असल्याचं दिसत आहे. मेघालयमध्ये काँग्रेसला 13 टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत. त्याचवेळी त्रिपुरामध्ये आठ टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत. अद्याप संपूर्ण आकडेवारी येणं बाकी आहे.
पोटनिवडणुकीत काँग्रेसला दिलासा
तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी खराब झाली असली, तरी पाच राज्यांतील 6 जागांवर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसनं चांगली कामगिरी केलीये. पश्चिम बंगालमधील सागरदिघी, महाराष्ट्रातील कसबा आणि तामिळनाडूतील इरोड जागेवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.