भाजपने कर्नाटक जिंकले; पण सर्वाधिक मते काँग्रेसला! 

मंगळवार, 15 मे 2018

बंगळूर : कर्नाटकमध्ये भाजप सत्तास्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. जागांच्या गणितामध्ये भाजपने काँग्रेसवर मात केली असली, तरीही एकूण मतांच्या संख्येत काँग्रेस भाजपपेक्षा किंचित पुढे आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार, काँग्रेसच्या मतांची टक्केवारी 37.9 आहे, तर भाजपला 36.5 टक्के मते मिळाली आहेत. 

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दुपारी सव्वा दोनपर्यंतच्या आकडेवारीनुसार, काँग्रेसला 1,20,32,733 इतकी मते मिळाली आहेत. एकूण मतांच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपला 1,15,99,787 इतकी मते मिळाली आहेत. याच आकडेवारीनुसार, आतापर्यंत 222 पैकी 172 मतदारसंघांमधीलच निकाल किंवा कल अधिकृतरित्या हाती आले आहेत. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये प्रमुख पक्षांना मिळालेली एकूण मते (दुपारी 2.15 पर्यंत) 

पक्ष मतांची टक्केवारी एकूण मते
काँग्रेस 37.9 1,20,32,733 
भाजप 36.5 1,15,99,787 
धर्मनिरपेक्ष जनता दल 18.1 57,67,019 
अपक्ष 3.9 12,38,742 
बहुजन समाज पक्ष 0.3 1,03,113 
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष 0.2 76,420 
नोटा 0.9 2,75,390 

Web Title: Congress gets more votes than BJP in Karnataka Elections