'महाआघाडीचे नेतृत्व काँग्रेसने करावे'

'महाआघाडीचे नेतृत्व काँग्रेसने करावे'

नवी दिल्ली -  आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व करण्यास काँग्रेसच सर्वाधिक योग्य पक्ष असला, तरी त्यांच्या नेत्यांनी मन मोठे करून प्रादेशिक पक्षांना सामावून घेणे आवश्‍यक आहे, असे मत राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी काल व्यक्त केले. 

‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत तेजस्वी यादव यांनी भाजपविरोधातील आघाडीबाबतची भूमिका सांगितली. ‘सप आणि बसपमध्ये आघाडी झाली ही चांगलीच गोष्ट आहे. मी अखिलेश यांची भेट त्यांचे अभिनंदन करण्यासाठी घेतली होती, काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी नव्हे. मात्र, काँग्रेस हा देशातील सर्वांत जुना पक्ष असून देशभरात त्यांचे अस्तित्व आहे, त्यामुळे विरोधकांच्या महाआघाडीचे नेतृत्व करण्यास हाच पक्ष सर्वाधिक योग्य आहे. मात्र त्यांनी प्रत्येक राज्यातील राजकीय परिस्थिती मान्य करायला हवी,’ असे तेजस्वी यादव म्हणाले. ज्या राज्यांत काँग्रेसचे बळ नाही, त्याठिकाणी प्रादेशिक पक्षाला आघाडीवर आणण्याइतके मोठे मन काँग्रेसने करायला हवे, अशी भूमिका तेजस्वी यांनी मांडली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com