'नोटाबंदीला विरोध करण्याचा काँग्रेसला नैतिक अधिकार नाही'

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य करत केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर टीका करण्याचा काँग्रेसला नैतिक अधिकार नसल्याची टीका केली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य करत केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर टीका करण्याचा काँग्रेसला नैतिक अधिकार नसल्याची टीका केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना नायडू म्हणाले, "आज एकही व्यक्ती काँग्रेसवर विश्‍वास ठेवत नाही. कारण त्यांनी देशावर राज्य केले आणि देशाचे नुकसान केले. हे सारे काँग्रेसने केलेल्या गैरकारभारामुळे झाले आहे. त्यांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी काय केले?' असा प्रश्‍नही नायडू यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, "त्यांनी विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन का केले नाही? न्यायालयाचा आदेश 2012 साली आला होता. त्यानंतरही समान अर्थव्यवस्था सुरूच राहिली. काँग्रेसच्या राज्यात सर्व गैरव्यवहार घडले. त्यामुळेच पंतप्रधानांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्याचा कॉंग्रेसला अधिकार नाही.'

हिवाळी अधिवेशनादरम्यान नोटाबंदीच्या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज वेळोवेळी तहकूब झाले. याबाबत बोलताना जेटली म्हणाले, " काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी संसदेचे कामकाज थांबविले आहे. तुम्ही "भारत बंद'ची हाक दिली. आक्रोश रॅली केली. पण हे सारे संपूर्णपणे अपयशी ठरले. तुम्हाला चर्चा हवी होती. आम्ही ती सुरू केली. मात्र तुम्ही पळून गेला.'

Web Title: Congress has no moral right to criticise centre on demonetisation