नोटाबंदीवर काँग्रेसचे 'जन वेदना संमेलन'

वृत्तसंस्था
रविवार, 8 जानेवारी 2017

नवी दिल्ली- काँग्रेस पक्षाच्या वतीने 11 जानेवारी रोजी 'जन वेदना संमेलन' भरविण्यात येणार असून, नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात लोकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे यावर चर्चा करण्यात येणार आहे. 

तालकटोरा स्टेडियममध्ये काँग्रेसचे एकदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्यात येणार आहे. त्यावेळी जन वेदना संमेलन घेण्यात येईल. 

"काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय, प्रादेशिक स्तरावरील सर्व नेते आणि पदाधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही राज्य पातळीवर अंमलबजावणी समिती स्थापन केली आहे," असे पक्षाचे ज्येष्ठ प्रवक्ते सी.पी. जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

ते म्हणाले, "जो देशाच्या आणि नागरिकांच्याही हिताचा नाही अशा प्रत्येक सरकारी निर्णयावर आम्ही प्रकाश टाकणार आहोत."
 
Web Title: Congress to Hold Meet on Demonetisation Problems on Jan 11