Election 2022 : काँग्रेसचे लक्ष डिजिटल प्रचारावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress use digital media platform
काँग्रेसचे लक्ष डिजिटल प्रचारावर

काँग्रेसचे लक्ष डिजिटल प्रचारावर

नवी दिल्ली : कोरोनाच्या सावटामुळे काँग्रेसने(national congress party) डिजिटल प्रचारावर(digital campeign) लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रॅम, ट्विटर यासारख्या सोशल मीडिया व्यासपीठाचा पुरेपूर वापर करण्यासाठी पक्षाने रणनीती आखली आहे. मतदारांपर्यंत पोचण्यासाठी एलईडी स्क्रिनच्या उपयोगाचेही या पक्षाने नियोजन केले आहे.

हेही वाचा: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह

कोणत्याही परिस्थितीत पंजाबचा गड हातचा जाऊ नये यासाठी काँग्रेस नेतृत्वाने ही विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(PM narendra Modi) सुरक्षेबाबत पंजाबमध्ये घडलेला गैरप्रकार आणि कॉँग्रेसने भाजपला दिलेले प्रत्युत्तर यामुळे आक्रमक प्रचाराचे नियोजन केले आहे. तर, गोवा, उत्तरराखंडमधील सत्ता भाजपकडून परत मिळविण्याचा प्रयत्न आहे. कोरोना संसर्गाचा वाढता(corona update india) वेग पाहता प्रत्यक्ष प्रचारावरील निर्बंध लांबण्याचीच शक्यता असल्याने डिजिटल प्रचार युद्धात भाजपने बाजी मारू नये यासाठी काँग्रेसने निवडणुकींची घोषणा होताच डिजिटल सक्रियता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रॅम, ट्विटर यासारख्या सोशल मीडियातून मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न असून राष्ट्रीय पातळीवरील आणि प्रदेश स्तरावरील नेत्यांमध्ये समन्वय राखणे आणि जिल्हा, तालुका, ब्लॉक, गावपातळीवरील नेत्यांना जोडण्याची तयारी करण्यात आली आहे. डिजिटल माध्यमांच्या वापरासाठी प्रशिक्षित तंत्रज्ञांचीही मदत घेतली जाणार आहे. तर भाषणांसाठी, नेत्यांचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रीनरुम देखील तयार केले जात आहेत.

हेही वाचा: मुंबईत दहावी, बारावीचे वर्गही ऑनलाईन?

ग्रीन रूम तयार करणार

कॉंग्रेस मुख्यालय आणि निवडणूक होत असलेल्या पाच राज्यांच्या मुख्यालयात ग्रीन रुम बनविले जाणार आहेत. याशिवाय सोनिया गांधींचे(sonia gandhi) निवासस्थान असलेल्या १० जनपथ येथे, तर राहुल गांधींचे निवासस्थान असलेल्या १२ तुघलक लेन येथेही ग्रीनरुम बनविले जाणार आहे. तर, जिल्हा आणि तालुका स्तरावर देखील छोटेखानी ग्रीनरूम तयार केले जाणार आहेत. याद्वारे नेत्यांची भाषणे आणि डिजिटल प्रचाराच्या चित्रफितींचा एलईडी मोबाईल व्हॅन, प्रोजेक्टरद्वारे तसेच सोशल मीडियावर प्रसार केला जाईल.

हेही वाचा: मुंबईत दहावी, बारावीचे वर्गही ऑनलाईन?

थेट प्रक्षेपणातून संवाद साधणार

थेट प्रक्षेपणातूनही मतदारांशी संवाद साधला जाईल. डिजिटल प्रचाराची स्थानिक जवळीक वाढविण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील भाषिक वैशिष्ट्यांचा लोकभाषा, लोकगितांचाही प्रचारात समावेश केला जाणार आहे. भाषणांव्यतिरिक्त सकारात्मक प्रचार, विरोधी पक्षांच्या धोरणावर हल्ला चढविणारी माहिती, आरोपांचा प्रतिवाद करणारी माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी बूथ पातळीवर कार्यकर्त्यांचे समूह सक्रिय करण्यात आले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top