राजधानीत काँग्रेसची आज जनआक्रोश सभा 

वृत्तसंस्था
रविवार, 29 एप्रिल 2018

महाराष्ट्रातूनही हजेरी 
महाराष्ट्रातून सुमारे 8500 नेते-कार्यकर्ते येथे दाखल झाले आहेत. त्यासाठी मुंबई प्रदेश कॉंग्रेसतर्फे स्वतंत्र रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती. तर, लातूर, नगर, जळगाव जिल्ह्यातूनही प्रत्येकी 2 बोगीनेदेखील कार्यकर्ते दिल्लीत पोहोचले आहेत. 
 

नवी दिल्ली : ऐन कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मोदी सरकारला संदेश देण्यासाठी काँग्रेसची आज (रविवारी) रामलीला मैदानावर जनआक्रोश सभा होणार होणार आहे. सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल करतील. 

लोकसभा निवडणूक आणि त्याआधी होणाऱ्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या निवडणुकांसाठी या जनआक्रोश सभेद्वारे कार्यकर्त्यांना सज्ज करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. यामुळे रामलीला मैदानावर होणारी ही सभा ऐतिहासिक बनविण्याचे नियोजन पक्षाने केले आहे. कॉंग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते, खासदार, तसेच कार्यकारिणी सदस्य यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

या सभेबद्दल पत्रकारांशी बोलताना संघटना सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी सांगितले, की देशात भय, घृणा, हिंसक वातावरण, इंधनाचे गगनाला भिडणारे दर, न्यायपालिकेची चिंताजनक स्थिती या विरुद्ध देशात वाटणारी चिंता जनआक्रोश सभेद्वारे व्यक्त केली जाणार आहे. तर, देशाची राजकारणाची दिशा आणि दशा या सभेतून ठरेल, असा विश्वास मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्रातूनही हजेरी 
महाराष्ट्रातून सुमारे 8500 नेते-कार्यकर्ते येथे दाखल झाले आहेत. त्यासाठी मुंबई प्रदेश कॉंग्रेसतर्फे स्वतंत्र रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती. तर, लातूर, नगर, जळगाव जिल्ह्यातूनही प्रत्येकी 2 बोगीनेदेखील कार्यकर्ते दिल्लीत पोहोचले आहेत. 
 

Web Title: Congress Jan Akrosh rally in Delhi