न्या. लोया मृत्यूप्रकरण ; याचिकेमागे राजकीय हेतू, कपिल सिब्बल यांचा आरोप

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 एप्रिल 2018

न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत हा गंभीर आरोप केला. लोया प्रकरणात कोणतीही कायदेशीर कारवाई न करता याचिका दाखल करण्यात आली होती.

नवी दिल्ली : न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेबाबत (पीआयएल) काँग्रेसकडून आरोप केले जात आहेत. लोया यांच्या मृत्यूप्रकरणात दाखल करण्यात आलेली याचिका फिक्स होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचे संबंध असलेल्या व्यक्तीनेच ही याचिका दाखल केली होती. ही याचिका दाखल करण्यामागे फक्त राजकीय हेतू होता, असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केला.

justice loya

न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत हा गंभीर आरोप केला. लोया प्रकरणात कोणतीही कायदेशीर कारवाई न करता याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच ते पुढे म्हणाले, न्यायपालिका संकटात आहे हे आम्ही वारंवार सांगत आहोत. सर्वोच्च न्यायालयाचे कॉलेजियम जे म्हणते तेच होईल, असा कायदा सांगतो. 

मात्र, केंद्र सरकारला त्यांच्या मनाप्रमाणे सर्व काही व्हावे असे वाटत आहे. त्यामुळे कॉलेजियमच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले जात असून, या शिफारशी मंजूर केल्या जात नाहीत, असा आरोपही सिब्बल यांनी यावेळी केला. 

Web Title: Congress Kapil Sibal Criticizes Modi Government over Justice Loya Case