"प्रियांका गांधींच्या जीवाला धोका, निवासस्थान काढून घेण्यामागे मोठा कट"

congress leader alka lamba said about priyanka gandhi
congress leader alka lamba said about priyanka gandhi

नवी दिल्ली- केंद्र सरकारने बुधवारी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांना दिल्लीतील लोधी स्टेट सरकारी निवासस्थान रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. यावरुन काँग्रेस नेत्या अलका लाम्बा यांनी मोदी सरकारवर टीका केली असून प्रियांका गांधी यांची हत्या होण्याची शंका व्यक्त केली आहे. त्यांनी यसंदर्भात ट्विट केले आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले,'काळजी करण्याची गरज नाही, लवकरच होणार एक...
मोदी सरकार गांधी परिवाराच्या सुरक्षेसोबत खेळत आहे. प्रियांका गांधी यांची सुरक्षा काढून घेण्यात आली. आता त्यांना निवासस्थानही सोडण्यास सांगण्यात आलं आहे. असं केल्याने प्रियांका गांधी यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांची हत्याही होऊ शकते, अशी शंका लाम्बा यांनी घेतली आहे. 

प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये राहायला यावं अशी त्यांच्या शुभचिंतकांची इच्छा आहे. त्यांनी लखनौमध्ये घर घेऊन राहावं. त्यांनी गरीब, मजूर, शेतकरी आणि बेरोजगार तरुणांच्या हक्कासाठी आवाज उठवला आहे. त्यांनी जनतेला ताकद मिळवून दिली आहे, असं लाम्बा यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. प्रियांका गांधी यांना दिल्लीतील घर रिकामं करायला लावून त्यांच्या हत्येचं षडयंत्र रचलं जात आहे का? याअगोदर त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे यामागे मोठा कट असल्याची शंका येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

गांधी परिवाराने देशासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे. गांधी परिवारासाठी सरकार एक दरवाजा बंद करत असेल, तर करोडो दुसरे दरवाजे उघडले जातील, असंही माजी आमदार अलका लाम्बा म्हणाल्या आहेत.

धक्कादायक! बेरोजगारीचा टक्का वाढतोय; देशातील प्रत्येक पाचवा व्यक्ती आहे...
बुधवारी गृहनिर्माण आणि शहर मंत्रालयाने प्रियांका गांधी यांना नोटीस पाठवली आहे. त्यात त्यांना एका महिन्याच्या आता दिल्लीतील लोधी निवासस्थान रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच त्यांना दंडही आकारण्यात आला आहे. प्रियांना यांनी हा दंड भरला आहे. प्रियांका गांधी 1997 पासून या बंगल्यात राहत होत्या, आता त्यांना 1 ऑगस्ट पर्यंत हे निवासस्थान सोडावं लागणार आहे.

दरम्यान, काँग्रेसने या प्रकरणावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. प्रियांका गांधी यांच्या लोकप्रियतेमुळे भाजप भेदरलं आहे. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. पण अशा कृतींना प्रियांका गांधी भीक घालत नाहीत, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. या सर्व प्रकाराला मी सूडाचं राजकारण मानतो, असं ते म्हणाले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com