तुम्ही गुजरात काँग्रेस मुक्त करु शकलेले नाही: शर्मा

वृत्तसंस्था
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

भाजप गुजरातला काँग्रेस मुक्त करू शकलेले नाही, देशाला काय करणार? आम्ही कधीही म्हणणार भाजप मुक्त भारत असावा. राफेल करारात भाजप सरकारकडून पारदर्शकता ठेवण्यात आलेली नाही.

नवी दिल्ली - भारताला तुम्ही काँग्रेस मुक्त करण्याचा बाता करत आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही गुजरातही काँग्रेस मुक्त करू शकलेला नाहीत, अशी बोचरी टीका काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपकडून सतत काँग्रेस मुक्त भारताची घोषणा करण्यात येत आहे. पण, भाजपला हे अद्याप जमू शकलेले नाही. गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली होती. याच मुद्द्यावरून आनंद शर्मा यांनी राज्यसभेत बोलताना भाजपला लक्ष्य केले आहे.

आनंद शर्मा म्हणाले, की भाजप गुजरातला काँग्रेस मुक्त करू शकलेले नाही, देशाला काय करणार? आम्ही कधीही म्हणणार भाजप मुक्त भारत असावा. राफेल करारात भाजप सरकारकडून पारदर्शकता ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे हा देशातील सर्वांत मोठा गैरव्यवहार असू शकतो. 

Web Title: Congress leader Anand Sharma replies to PM Narendra Modi