
Rahul Gandhi: राहुल गांधींनी शासकीय बंगला केला रिकामा; बंगल्याची चावी लोकसभा सचिवालयाला करणार परत
काँग्रेसचे नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. हा बंगला राहुल गांधींना खासदार म्हणून देण्यात आला होता. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधीना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी आपले सामान 10, जनपथ येथे हलवण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपलं निवासस्थान रिकामं केलं आहे. 12, तुघलक लेन या शासकीय निवासस्थानात राहुल गांधी वास्तव्यास होते. मात्र खासदारकी गेल्यामुळे त्यांना त्यांचं घर रिकामं करण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला होता.
चार दिवसांपूर्वी राहुल यांनी बरेच सामान 10, जनपथ या सोनिया गांधींच्या निवासस्थानी पाठवलं होतं. काल संध्याकाळी त्यांनी शेवटचं शिफ्टींग देखील केलं आहे. ते स्वतः काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधींच्या बंगल्यात शिफ्ट झाले आहेत.
राहुल गांधी यांनी 14 एप्रिलला बंगल्यातून त्यांचे कार्यालय हलवले. काल (शुक्रवारी) संध्याकाळी त्यांनी शेवटचं शिफ्टींग केलं राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. हा बंगला राहुल गांधींना खासदार निवास म्हणून देण्यात आला होता. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधीना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी आपले सामान 10, जनपथ येथे हलवण्यास सुरुवात केली आहे. काल संध्याकाळी त्यांचे सर्व सामान हलवण्यात आले. तर राहुल गांधी 12 तुघलक लेन या शासकीय बंगल्याची चावी लोकसभा सचिवालयाला लवकरच परत करणार आहेत.
23 मार्चला सुरत कोर्टानं राहुल गांधींनी दोषी ठरवलं होतं
मोदी आडनाव प्रकरणात 23 मार्चला सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलं होतं. त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आलं होतं. या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी न्यायालयाने राहुल गांधींना 30 दिवसांची मुदत दिली होती. मोदी आडनावावरील वक्तव्यासंदर्भात झालेल्या राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ज्यामुळे राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यास अपात्रतेची कारवाई रद्द होण्याची ही शक्यता आहे.