चिदंबरम तर, ‘गुजरात मॉडेल’चे बळी; कोणाची टीका?

टीम ई-सकाळ
Friday, 6 September 2019

भोपाळ : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम सध्या तिहार कारागृहात आहेत. चिदंबरम यांना आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. चिदंबरम यांच्यावर होणारी कारवाई ही सूडबुद्धीनं होत असल्याचा आरोप काँग्रेसने यापूर्वी केला आहे.

भोपाळ : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम सध्या तिहार कारागृहात आहेत. चिदंबरम यांना आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. चिदंबरम यांच्यावर होणारी कारवाई ही सूडबुद्धीनं होत असल्याचा आरोप काँग्रेसने यापूर्वी केला आहे.

चर्चा गुजरात मॉडेलची
निष्पाप लोकांवर खोटे आरोपांमध्ये अडकविण्याच्या गुजरात मॉडेलची अंमलबजावणी केंद्र सरकारकडून सुरू असून, चिदंबरम हे त्याचेच बळी आहेत, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी आज केली. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी 19 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, या पार्श्‍वभूमीवर दिग्विजय यांनी सरकारवर टीका केली.

गडकिल्ल्यांवर हॉटेल यावर खासदार संभाजीराजे म्हणाले...

‘चिदंबरम प्रामाणिक माणूस’
‘केंद्रातील सरकार द्वेषभावना पसरवित आहे. आज सत्तेवर असलेले लोक ‘गुजरात मॉडेल’ची अंमलबजावणी करत आहेत. गुजरातमध्ये सत्तेवर असताना त्यांनी निष्पाप लोकांना अडकविणे, त्यांच्यावर खोटे आरोप ठेवणे असेच प्रकार केले,’ असा दावा दिग्विजयसिंह यांनी पत्रकारांशी बोलताना केला आणि चिदंबरम यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध केला. मी चिदंबरम यांना 35 वर्षांपासून ओळखतो, ते प्रामाणिक आहेत, असेही दिग्विजयसिंह म्हणाले. मध्य प्रदेशात भाजप सलग 15 वर्षे सत्तेत असताना त्यांनी मला अडकविण्याचा बराच प्रयत्न केला; पण मी काहीच चुकीचे केले नसल्याने त्यांना काही करता आले नाही, असा दावाही दिग्विजय यांनी केला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे रतुल पुरी यांच्याविरोधात "ईडी'ने केलेल्या कारवाईबाबत विचारले असताना याबाबत काही माहीत नसल्याचे दिग्विजय म्हणाले.

भुजबळांनी दिला सर्व चर्चांना पूर्णविराम

कार्ती चिदंबरम यांना फटका
कार्ती चिदंबरम यांनी न्यायालयात जमा केलेली दहा कोटी रुपयांची अनामत रक्कम आणखी तीन महिने परत करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. कार्ती चिदंबरम यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. परदेशात जायचे असल्याने आपल्याला ही रक्कम परत मिळावी, अशी विनंती कार्ती यांनी केली होती. न्यायालयाने मे महिन्यातही कार्ती यांची अशी याचिका फेटाळून लावली होती. कार्ती हे गेल्या सहा महिन्यांत 51 दिवस परदेशात होते, असे तपास संस्थांनी न्यायालयात आज सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leader chidambaram is victim of gujarat model digvijay singh