उपोषणादरम्यान पंतप्रधानांनी केले 'लंच' ?

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 एप्रिल 2018

सूरजेवाला यांनी पंतप्रधानांच्या एकदिवसीय उपोषण कार्यक्रमाचे पत्रकच जारी केले. यामध्ये दिल्लीतून निघताना दिल्ली विमानतळावर सकाळी 6.40 वाजता त्यांच्यासाठी नाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते.

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून संसदेचे कामकाज सुरु असताना गोंधळ घालण्यात आला. त्यामुळे संसदेचे कामकाज काही दिवसांसाठी तहकूब करावे लागले. याचा विरोध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदिवसीय उपोषण करायचे ठरवले. मात्र, या उपोषणादरम्यान पंतप्रधानांनी 'ब्रेक फास्ट' आणि 'लंच' केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते रणदीप सूरजेवाला यांनी केला. सूरजेवाला यांनी पंतप्रधानांच्या उपोषण कार्यक्रमाचे पत्रक जारी करत पंतप्रधानांच्या उपोषणाची खिल्ली उडवली.

Congress

सूरजेवाला यांनी पंतप्रधानांच्या एकदिवसीय उपोषण कार्यक्रमाचे पत्रकच जारी केले. यामध्ये दिल्लीतून निघताना दिल्ली विमानतळावर सकाळी 6.40 वाजता त्यांच्यासाठी नाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते. नाश्त्यानंतर सकाळी 9.20 मिनिटांनी चेन्नई विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्यानंतर वेळापत्रकानुसार, सर्व कामे आटोपून दुपारी 2.25 च्या सुमारास चेन्नई विमानतळावर त्यांच्यासाठी दुपारच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. अशाप्रकराचे पंतप्रधान मोदींचा एकदिवसीय उपोषणाचा कार्यक्रम पार पडला. 

अशाप्रकारे पंतप्रधानांचे उपोषण एका तासात संपले. सूरजेवाला यांनी या खोट्या उपोषणासाठी पंतप्रधानांना शुभेच्छाही दिल्या. तसेच हे खोटे आहे, असे सांगण्याचे आव्हानही त्यांनी पंतप्रधानांना केले.

Web Title: Congress Leader Criticizes PM Narendra Modi on Fast Issue