मोदींऐवजी सुषमा स्वराज पंतप्रधान असत्या तर...: दिग्विजय सिंह

digvijaya singh
digvijaya singh

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या जर पंतप्रधान असत्या तर त्यांचे सरकार अधिक यशस्वी ठरले असते, असे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले, 'आघाडीचे राजकारण देशाच्या राजकारणासाठी आवश्यक आहे. कारण ही विचारधारेची लढाई आहे. देशाच्या हितासाठी महात्मा गांधी, पंडित नेहरु, राममनोहर लोहिया यांची विचारधार आणि कांशीराम यांची विचारधाराच चालू शकते. मात्र, गोडसे आणि गोळवलकर यांची विचारधारा यशस्वी ठरु शकत नाही.'

माकपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तुलना दहशतवादी संघटनेशी केली होती. काँग्रेसही सातत्याने संघावर टीका करताना दिसते. यावर दिग्विजय सिंह म्हणाले, 'आपण कधी संघाला दहशतवादी संघटना म्हटले नाही. आम्ही आरएसएसवर बंदीबाबत बोललेलो नाही. जी बंदी केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर घालण्यात आली होती. जी बंदी केंद्र सरकारच्या परिसरात शाखा सुरु करण्याबाबत होती. तीच बंदी मध्य प्रदेशमध्ये हटवण्यात आली होती. ती बंदी आम्ही पुन्हा लागू करण्याबाबत भाष्य केले होते. जर संघाला आमच्या प्रस्तावामुळे इतका त्रास होत असेल तर त्यांनी मोदींना बंदी हटवून लष्कर आणि बीएसएफच्या ठिकाणांवर संघाच्या शाखांना परवानगीची मागणी करावी.'

'मी, मायावतींचा खूप आदर करतो. अखिलेश माझ्या मुलाप्रमाणे आहेत. मुलायम सिंह यांचाही मी आदर करतो. त्यांच्याबरोबर विचारधारेची आघाडी व्हावी, असे आम्हाला वाटते. देशाच्या राजकारणासमोर पर्याय काय आहे, गांधींची विचारधारा की गोळवलकर यांची विचारधारा, असा सवाल त्यांनी केला. सुषमाजींचा मी खूप आदर करतो. जर मोदींऐवजी स्वराज पंतप्रधान असते तर त्यांचे सरकार विद्यमान सरकारपेक्षा अधिक यशस्वी ठरले असते,' असेही दिग्विजय सिंह म्हणाले.

कौन बनेगा पंतप्रधान...
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले होते की, मध्य प्रदेशची निवडणूक ही 'कौन बनेगा करोडपती' सारखी झाली आहे. दिग्विजय सिंह, कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे- कौन बनेगा मुख्यमंत्री? असा खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. यावर दिग्विजय सिंह म्हणाले की, 2019 मध्ये पंतप्रधान कौन बनेगा- नरेंद्र मोदी की राजनाथ सिंह ? राजनाथ सिंह यांनाही पंतप्रधान बनण्याची महत्वकांक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com