राम मंदिराच्या अशुभ मुहूर्तामुळे अमित शहांना कोरोना; काँग्रेस नेत्याची मोदींना खास विनंती

 Congress Leader digvojay singh, amit shah, corona
Congress Leader digvojay singh, amit shah, corona

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  (Amit Shah Corona Positive), यांच्यासह भारतीय जनता पक्षांच्या अन्य काही नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. काँग्रेस नेत्याने या प्रकरणाचा संबंध थेट राम मंदिर भूमिपूजनाशी  जोडला आहे. भाजप सरकारने सनातन हिंदू धर्माच्या परंपरेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी केला आहे. यासंदर्भात त्याने एकामागोमाग एक असे काही ट्विट करत  भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांची बरसात केली आहे. राम मंदिराच्या भूमि पूजनाचा मुहुर्त अशुभ असून सध्याच्या परिस्थितीत हा कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंतीही दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.  

दिग्विजय सिंह यांनी ट्विटमध्ये 'सनातन हिंदू धर्मातील परंपरेकडे दुर्लक्षित केल्याचे परिणाम अशा आशयाच्या ट्विटमध्ये लिहिलंय की,  
1- राम मंदिरातील समस्त पुजारी कोरोना पॉझिटिव्ह 
2- उत्तर प्रदेशच्या मंत्री कमला रानी वरुण कोरोना पॉझिटिव्ह 
3- उत्तर प्रदेशचे भाजपा अध्यक्ष कोरोना पोझिटिव्ह असून तेही रुग्णालयात दाखल  
4- केंद्रिय गृहमंत्री अमित शाह कोरोना पोझिटिव्ह 
5- मध्यप्रदेशचे  मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह 
6- कर्नाटकमध्येही भाजपाचे मुख्यमंत्री कोरोना पोझिटिव्ह 
असे ट्विट त्यांनी केले आहे. प्रभू राम कोट्यवधी हिंदूचे श्रद्धास्थानाचे केंद्र आहे. हजारो वर्षांच्या हिंदू धर्मातील परंपरेचो तोडमोड करु नका, असा उल्लेखही दिग्विजय सिंग यांनी ट्विटमध्ये केलाय.  

याशिवाय त्यांनी राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम टाळण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली आहे. 5 ऑगस्ट हा मुहूर्त राम मंदिराच्याभूमि पूजनासाठी अशुभ असून नियोजित कार्यक्रमात बदल करावा, असे दिग्वजय सिंग यांनी म्हटले आहे. शंभर वर्षांच्या संघर्षानंतर राम मंदिर उभारण्याचा योग आला आहे. हट्टापायी यात विघ्न निर्माण करु नका, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com