शिवराजसिंह चौहान यांचे काँग्रेसमध्ये स्वागत- कमलनाथ

Congress Leader Kamal Nath Says Even Cm Shivraj Singh Chaohan Is Welcome To Join Party
Congress Leader Kamal Nath Says Even Cm Shivraj Singh Chaohan Is Welcome To Join Party

भोपाळ- मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे काँग्रेस पक्षात स्वागत आहे, असे मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी शनिवारी म्हटले आहे. शिवराजसिंह यांना काँग्रेसचे दरवाजे कायम उघडे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबूलाल गौर यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमादरम्यान छिंदवाडा येथील उत्तम विकासासाठी कमलनाथ यांच्या कामाचे कौतुक केले होते. त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना कमलनाथ यांनी हे विधान केले आहे.

शनिवारी भोपाळ येथे एका पत्रकार परिषदेत कमलनाथ बोलत होते. बाबूलाल गौर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं आमंत्रण देणार का असे विचारल्यानंतर या प्रश्नाचे उत्तर देताना कमलनाथ यांनी, केवळ बाबूलाल गौर यांनाच नाही तर शिवराजसिंह चौहान यांनाही काँग्रेस पक्षामध्ये सामील होण्यासाठी निमंत्रण देतोय असे म्हटले.

त्याचबरोबर, गौर यांना सर्व माहीती आहे ते सत्य जाणतात. त्यांनी सत्य स्विकारले आहे, आम्ही केलेल्या कामाची त्यांना जाणीव झाली आहे म्हणूनच त्यांनी आमच्या विकासकामाचे कौतुक केले आहे असे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच, त्यांच्या कार्यकाळात बाबूलाल गौर हे नगरविकास मंत्री असल्याची आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com