Live Video: काँग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या...

congress leader murder in lockdown live video at mp
congress leader murder in lockdown live video at mp

जबलपूर (मध्य प्रदेश) : देशात लॉकडाऊन असताना एका काँग्रेस नेत्याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धर्मेंद्र सोनकर असे हत्या झालेल्या नेत्याचे नाव आहे.

जबलपूर शहरातील नुमंतल भागातील काँग्रेसचे नेते व राधा कृष्णा प्रभागचे माजी नगरसेवक धर्मेंद्र सोनकर यांच्यावर चार वेळा गोळीबार करण्यात आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे. नेत्याच्या हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयीत आरोपीचे नाव मोनू सोनकर असे आहे. धर्मेंद्र यांना ठार मारल्यानंतर त्याने आत्मसमर्पन करत गुन्ह्याची कबुली दिली. मोनूला ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वीही मोनूने एकाची हत्या केली होती. जामिनावर तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा गोळीबार करत धर्मेंद्र सोनकर यांची हत्या केली.

धर्मेंद्र सोनकर दुपारी त्यांच्या घरासमोर मंदिराशेजारी आपल्या एका मित्रासोबत बसले होते, त्यावेळी मोनू सोनकर आपल्या साथीदारांसह तेथे आला आणि गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे धर्मेंद्र स्वत:ला वाचवण्यासाठी घराकडे धावले. परंतु, तोपर्यंत त्यांच्या छाती आणि मांडीला दोन गोळ्या लागल्या, तर धर्मेंद्र यांच्या जोडीदाराच्या पायाला गोळी लागली. धर्मेंद्र यांनी घरातून पिस्तूल घेऊन आरोपीच्या मागे पळ काढला. पण तोपर्यंत मोनू सोनकर आपल्या साथीदारांसह तेथून पळून गेला. धर्मेंद्र यांचा आवाज ऐकून त्यांचे कुटुंब बाहेर आले आणि त्यांनी धर्मेंद्र सोनकर यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, गोळीबाराची माहिती परिसरात पसरल्यानंतर धर्मेंद्र सोनकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले. मोनू सोनकर आणि धर्मेंद्र सोनकर यांच्यात जमीनीचा वाद होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com