
'प्रभू राम अयोध्येपासून लंकेपर्यंत पायी चालले, राहुल गांधी तर...'; कॉंग्रेस नेत्याचं वक्तव्य
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी पक्षाच्या 'भारत जोडो यात्रे'चे नेतृत्व करत आहेत.सध्या त्यांचा ताफा कर्नाटकात आहे. या यात्रेदरम्यान, काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांची तुलना भगवान श्री राम यांच्याशी केल्याने नवा वाद सुरू झाला आहे.
राजस्थानमधील गेहलोत सरकारमधील मंत्री असलेले प्रसादीलाल मीणा राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की, 'भगवान रामही अयोध्येपासून श्रीलंकेला पायी गेले होते. पण राहुल गांधींची पदयात्रा त्याहूनही जास्त लांब आहे. ही यात्रा ऐतिहासिक असेल, राहुल गांधी यांची जी पदयात्रा निघणार आहे, ती ऐतिहासिक पदयात्रा असेल. प्रभू राम अयोध्येपासून श्रीलंकेत पायी गेले, पण राहुल गांधी त्याहूनही जास्त चालत आहेत. राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर चालत आहेत. आजपर्यंत कोणी एवढा पायी प्रवास केला आहे का? राहुल गांधींच्या पदयात्रेमुळे देशातील वातावरण बदलेल.'
मीना पुढे म्हणाले की, 'देशात ज्या प्रकारचे वातावरण आहे, ज्याप्रकारे द्वेष पसरवला जात आहे, तो राहुल गांधींच्या दौऱ्याने संपुष्टात येईल. या यात्रेने संपूर्ण देशातील वातावरण बदलणार आहे.'
हेही वाचा: Diwali Offer: Vi चे युजर्सना दिवाळी गिफ्ट; मोबाईल रिचार्जवर मिळतोय 75 जीबी फ्री डेटा अन् बरंच
नाना पटोले यांनीही केली तुलना?
यादरम्यान महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींची तुलना भगवान रामाशी केली. पटोले म्हणाले, 'भगवान रामाच्या नावात 'आर' आहे आणि राहुल गांधींच्या नावातही 'आर' आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण राहुल गांधींची तुलना प्रभू रामाशी करत आहोत. भारतीय जनता पक्ष (भाजप) आपल्या नेत्यांबाबत हे करतो, असा आरोप पटोले यांनी केला. राहुल गांधी हे माणूस असून ते मानवतेसाठी आणि देशासाठी काम करत आहेत, असेही पटोले म्हणाले.
हेही वाचा: अधिकारी होणार भावा! पुण्यात 'MPSC'च्या विद्यार्थाचा वाहतूक पोलिसाला हिसका, Viral Video पाहाच
7 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेने आतापर्यंत केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांमधून प्रवास केला आहे. कर्नाटक काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, यात्रेदरम्यान राहुल गांधी 20 मिनिटांची कसरत करतात, हलका नाश्ता करतात आणि दररोज 25 किमी चालतात. पक्षाने सांगितले की त्यांचा दिवस पहाटे 5 वाजता सुरू होतो आणि रात्री 11 वाजता संपतो.