राहुल नाही मायावती असतील आगामी पंतप्रधान- काँग्रेस नेते

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 जानेवारी 2019

देशाच्या आगामी पंतप्रधान हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नाहीतर मायावती असतील असा दावा लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी केला आहे. आगामी निवडणुकीत महाआघाडीचा विजय होईल आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती या पंतप्रधान पदाच्या दावेदार असतील, असे सांगितले.

नवी दिल्ली- देशाच्या आगामी पंतप्रधान हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नाहीतर मायावती असतील असा दावा लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी केला आहे. आगामी निवडणुकीत महाआघाडीचा विजय होईल आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती या पंतप्रधान पदाच्या दावेदार असतील, असे सांगितले.

पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मायावतींचे नाव सर्वांत पुढे राहील. आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या जागांमध्ये दुपटीने वाढ होत काँग्रेस 90 जागापर्यंत मजल मारील असेही सुतोवाच त्यांनी केले. अल्वर येथील रामगड विधानसभा मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर नटवर सिंह यांचा मुलगा जगत सिंह निवडणूक लढवत आहे. त्याच्या प्रचारासाठी आल्यानंतर नटवर सिंह बोलत होते.

राजस्थान सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले की, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील मतभेद पाहता काँग्रेसचे सरकार जास्त दिवस टिकू शकणार नाही. सोनिया गांधी यांच्यामुळे पक्षात एकजूट कायम आहे. त्यांच्यानंतर पक्षात फूट पडणार हे निश्चित आहे, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली. महाआघाडीबाबत बोलताना नटवर सिंह म्हणाले की, ज्यापद्धतीने आघाडीची स्थापना झाली आहे. त्यावरून महाआघाडीचा विजय निश्चित आहे. भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरेल पण बहुमतापासून ते दूर राहतील.

Web Title: Congress Leader Natwar Sinh Said Mayawati Could Be Next Pm