केंद्र सरकारला दिलेला 'तो' सल्ला आणि पृथ्वीराज चव्हाणांना काशी विश्वनाथ मंदिरात आजीवन प्रवेश बंदी..

pruthviraj chavhan
pruthviraj chavhan

मुंबई : देशात कोरोना व्हायरसची दहशत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढताना पाहायला मिळतायत. लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक स्थिती खालावत चालली आहे. म्हणून केंद्र सरकारनं तब्बल २० लाख कोटींची तरतूद देशातल्या नागरिकांसाठी केली आहे. यावर भाजप आणि काँग्रेस यांच्यात चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलं आहे. अशात आता काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना केंद्र सरकारला दिलेला सल्ला महागात पडला आहे.  

केंद्र सरकारनं २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केल्यानंतर काँग्रेसकडून भाजपवर सतत टीका करण्यात येत होती. त्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही मोदी सरकारवर टीका केली होती. अशा संकट काळात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने देशातील विविध धार्मिक स्थळांच्या ट्रस्टमध्ये पडून असलेलं सोनं कर्जस्वरुपात ताब्यात घ्यावं, असा सल्ला काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला होता. मात्र आता त्यांचा हा सल्ला त्यांनाच महागात पडला आहे. 

याच पार्श्वभूमीवर मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीच्या काशी विश्वनाथाच्या मंदिरात पृथ्वीराज चव्हाण यांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आजीवन प्रवेश बंदी घालण्याचा निर्णय तिथल्या महंतांनी घेतला आहे. तसंच देशातल्या इतर ज्योतिर्लिंगाच्या पुरोहितांनीही चव्हाण कुटुंबाला मंदिरात प्रवेश नाकारण्याचं आवाहन या महंतांनी केलं आहे. पृथ्वीराज चव्हाण हे मानसिकदृष्ट्या विक्षिप्त असल्याचंही महंतांनी म्हटलं आहे. 

"काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात १९८३ च्या काळात काशी विश्वनाथ मंदिरात चोरी झाली होती. या चोरीत काँग्रेसनं  मुख्य भूमिका निभावली होती. तसंच पृथ्वीराज चव्हाण यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. एवढंच नाही तर ते पूर्वाग्रहानं ग्रासलेले आहेत", असं काशी विश्वनाथ मंदिराचे माजी महंत आणि  डॉ. कुलपती तिवारी यांनी म्हंटलंय. 

दरम्यान "माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं लोकांपुढे मांडून धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला", असं स्पष्टीकरण पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय. 

congress leader pruthviraj chavhan banned in kaashi vishwanath mandir for lifetime read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com