मोदी-शहांसमोर निवडणूक आयोग झुकला; काँग्रेसचा आरोप

Sakal | Thursday, 16 May 2019

निवडणूक आयोग त्यांच्या विश्वासाहर्तमुळे जाणला जातो. निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया धोक्यात आली असून, आयोग मोदींच्या हिताचे निर्णय घेत आहे. यामुळे लोकशाहीची नुकसान होत आहे. निवडणूक आयोग विश्वसनीयता गमावून बसला आहे. मोदी शहांसमोर निवडणूक आयोग झुकला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन सभांसाठी निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये प्रचाराची मुदत आज रात्रीपर्यंत ठेवली. मोदी आणि शहांसमोर निवडणूक आयोग झुकला असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीर सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेबद्दल प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोग मोदींच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचाही आरोप त्यांनी केली. कोलकतामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर निवडणूक आय़ोगाने तेथील प्रचाराची मुदत उद्याऐवजी आजच संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरजेवाला म्हणाले, की निवडणूक आयोग त्यांच्या विश्वासाहर्तमुळे जाणला जातो. निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया धोक्यात आली असून, आयोग मोदींच्या हिताचे निर्णय घेत आहे. यामुळे लोकशाहीची नुकसान होत आहे. निवडणूक आयोग विश्वसनीयता गमावून बसला आहे. मोदी शहांसमोर निवडणूक आयोग झुकला आहे. प्रचाराचा वेळ कमी करून निवडणूक आयोगाने लोकशाहीवर काळा डाग लावला आहे. मोदींसाठी निवडणूक आयोगाचे हे गिफ्ट आहे. मोदींच्या दोन सभेनंतर निवडणूक आयोगाने प्रचार संपविण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाच्या मॉडेल कोड ऑफ कंडक्टचे नाव बदलून मोदी कोड ऑफ मिसकंडक्ट असे ठेवले पाहिजे. निवडणूक आयोगही आता दबावाखाली काम करत आहे.