
राहुल गांधींना (Rahul Gandhi) शिक्षा होताच काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी (Renuka Chaudhary) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचं म्हटलंय.
PM Modi News: PM मोदींना 'ते' वक्तव्य महागात पडणार? रेणुका चौधरी मोदींविरुध्द दाखल करणार अब्रुनुकसानीचा दावा!
'मोदी'च्या आडनावावर टिप्पणी केल्याबद्दल गुजरातच्या सुरत कोर्टानं (Surat Court) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र, ही शिक्षा 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना जामीनही मिळाला.
राहुल गांधींना (Rahul Gandhi) शिक्षा होताच काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी (Renuka Chaudhary) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचं म्हटलंय.
आपण दावा केल्यानंतर न्यायालयात किती वेगानं हालचाली होतात, तेही पाहणार असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. सूरत न्यायालयानं राहुल गांधींना अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिक्षा सुनावल्याच्या पार्श्वभूमीवर चौधरींनी संताप व्यक्त केला आहे.(Latest Marathi News)
रेणुका चौधरी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. 2018 मध्ये संसदेत राज्यसभेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) रेणुका चौधरी यांना शूर्पणखा म्हटलं होतं. त्याचा उल्लेख करत चौधरी यांनी एक छोटी व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. (Marathi Tajya Batmya)
त्यात नरेंद्र मोदी हे राज्यसभेच्या अध्यक्षांना उद्देशून ‘रेणुका चौधरी यांनी असंच विनोद करत राहावेत कारण रामायण बंद झाल्यापासून असे विनोद ऐकले नाहीत’, असं म्हणताना दिसत आहेत. ही क्लिप 7 फेब्रुवारी 2018 ची आहे. राज्यसभेला संबोधित करताना विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपावर नरेंद्र मोदींनी ही प्रतिक्रिया दिली होती.
या क्लिपसोबत त्यांनी कॅप्शनही दिली आहे. मी 'शूर्पणखा' या शब्दावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे. आता मला पाहायचं आहे की, न्यायालय त्यावर किती वेगानं कारवाई करतं, असं चौधरी म्हणाल्या आहेत.