esakal | काँग्रेस नेते सचिन पायलट यांना कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

sachin pilot tested corona positive

देशातील काही दिग्गज आणि राजकीय नेत्यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. आता काँग्रेसमधील नेते सचिन पायलट यांनाही कोरोना ससंर्ग झाला आहे. 

काँग्रेस नेते सचिन पायलट यांना कोरोनाची लागण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जयपूर - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. दिल्लीत कोरोनाचा संसर्ग वेगानं होत असल्याचं समोर आलं होतं. तसंच दिवाळीनंतर देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. देशातील काही दिग्गज आणि राजकीय नेत्यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. आता काँग्रेसमधील नेते सचिन पायलट यांनाही कोरोना ससंर्ग झाला आहे. याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली.

सचिन पायलट यांनी ट्विटरवर म्हटलं की, माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी चाचणी करून घ्यावी. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत असून लवकरच बरा होईन. 

राजस्थानमध्येही अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशोक गेहलोत यांच्या सरकारने राजस्थानमध्ये प्रत्येक व्यक्तीने मास्क घालावा यासाठी विधानसभेत कायदाही संमत केला आहे. याशिवाय सोशल डिस्टन्सिंग आणि इतर गोष्टींची काळजी घेतली आहे. तरीही राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.