दिल्ली दंगलीत अडकला काँग्रेसचा बडा नेता; चार्जशीटमध्ये नाव

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

पोलिसांनी दिल्ली हायकोर्टात सादर केलेल्या माहितीनुसार या दंगलीत 40 मुस्लिम आणि 13 हिंदू मारले गेले होते.

नवी दिल्ली : या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दिल्लीच्या उत्तर-पूर्व भागात झालेल्या दंगलीच्या आरोपपत्रात आता काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रिय मंत्री सलमान खुर्शीद यांचंही नाव आलं आहे. या प्रकरणात एका साक्षीदाराने आपली साक्ष देताना असं म्हटलंय की, सलमान खुर्शीद यांनीही प्रक्षोभक आणि उत्तेजक भाषण दिले होते, ज्यामुळे ही दंगल भडकली. या साक्षीदाराची साक्ष सीआरपीसीच्या ( Code of Criminal Procedure) कलम 164 नुसार नोंदवून घेण्यात आली आहे. पोलिसांचं असं म्हणणं आहे की, साक्षीदार दंगल भडकवणाऱ्या मुख्य गटाचा भाग होता. खुर्शीद यांच्याव्यतिरीक्त प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण, सीपीएम नेत्या वृंदा करात यांचंही नाव या आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आलं आहे. 

Delhi riots chargesheet: Khurshid, Kavita Krishnan named by accused for  'provocative speeches' | India News,The Indian Express

परंतु, दंगलीचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी अद्याप आपल्या 17 हजार पानी आरोपपत्रात भडकाऊ भाषणाचा उल्लेख केला नाहीये. पोलिसांनी या सर्वांविरुद्ध न्यायाधीशांसमोर आपली साक्ष नोंदवणाऱ्या साक्षीदाराचे नाव गोपनीय ठेवले आहे. तर दुसऱ्या एका आरोपीचे नाव सार्वजनिक केलं आहे. 

हेही वाचा - गरीबों का शोषण, ‘मित्रों’ का पोषण, यही है मोदी जी का शासन - राहुल गांधी
आपल्यावर झालेल्या आरोपांना उत्तर देताना खुर्शिद म्हणाले की, जर तुम्ही कचरा गोळा करत असाल, तर तुम्हीही घाण व्हाल. एखाद्याने केलेल्या विधानाला आधार देण्यासाठी कोणताही कचरा वापरला जाऊ शकतो. मी प्रक्षोभक भाषण केलं म्हणजे काय केलं, हे जाणून घ्यायला मीही उत्साही आहे...

उत्तर-पूर्व दिल्लीत 23 ते 27 फेब्रुवारीदरम्यान दंगल झाली होती. या दंगलीत 53 लोक मृत्यूमुखी पडले होते. 13 जुलै रोजी पोलिसांनी दिल्ली हायकोर्टात सादर केलेल्या माहितीनुसार या दंगलीत 40 मुस्लिम आणि 13 हिंदू मारले गेले होते. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 751 एफआयआर दाखल केल्या आहेत. या तपासाविषयीची माहिती सार्वजनिक करण्याला पोलिसांनी नकार दिला होता. यामध्ये काही संवेदनशील माहिती असल्याचे कारण देत ती वेबसाइटवर टाकण्यासदेखील नकार दिला होता.

हेही वाचा - राफेल कराराची 'क्रोनोलॉजी' आता समजली; CAG अहवालावरुन काँग्रेसचा निशाणा

दंगलीतील आरोपी खलिद सैफी याने पोलिसांसमोर कलम 161 नुसार नोंदवलेल्या आपल्या जबाबात स्वराज अभियानाचे नेते योगेंद्र यादव, प्रशांत भूषण आणि सलमान खुर्शीद यांचंही नाव घेतलं आहे. कलम 164 नुसार नोंदवलेला जवाब हा कलम 161 नुसार नोंदवलेल्या जबाबाहून अधिक महत्वपूर्ण मानला जातो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Leader Salman Khurshid Name in Charge sheet of Delhi Riot