खुनातील आरोपी गांधी घरण्याचे निकटवर्तीय संजय सिंह करणार भाजपमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जुलै 2019

संजय सिंह यांनी आज पक्ष सदस्यत्व आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी संजय सिंह यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी याची माहिती सभागृहात दिली. संजय सिंह यांच्यावर बॅडमिंटनपटू अमिताच्या पतीच्या खूनाचा आरोपही आहे. सुरवातीला अमिता ही आपल्या बहिणीसारखी आहे असे सांगणाऱ्या संजय सिंह यांनी तिच्यासोबतच नंतर लग्न केले.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव आणि राहुल गांधी यांनी तडकाफडकी दिलेल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर सुरू झालेली काँग्रेसची घसरण सुरूच आहे. आज (ता.30) काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून, गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय असलेले उत्तर प्रदेशातील नेते संजय सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

संजय सिंह यांनी आज पक्ष सदस्यत्व आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी संजय सिंह यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी याची माहिती सभागृहात दिली. संजय सिंह यांच्यावर बॅडमिंटनपटू अमिताच्या पतीच्या खूनाचा आरोपही आहे. सुरवातीला अमिता ही आपल्या बहिणीसारखी आहे असे सांगणाऱ्या संजय सिंह यांनी तिच्यासोबतच नंतर लग्न केले.

लोकसभा निवडणुकीत संजय सिंह यांनी सुल्तानपूर लोकसभा मतदारसंघातून मनेका गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या संजय सिंह यांना काँग्रेसने आसाममधून राज्यसभेवर पाठवले होते. 1980 मध्ये जेव्हा संजय गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा संजय सिंह यांनी त्यांना पाठिंबा दिला होता.  

अमेठी मतदारसंघात भक्कम जनाधार असलेल्या संजय सिंह यांनी याआधीही एकदा काँग्रेस पक्ष सोडला होता. मात्र यावेळी आपण पूर्ण विचार करून पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. ''गेल्या 15-20 वर्षांपासून काँग्रेसमध्ये विसंवादाची स्थिती निर्माण झाली आहे. आज घडीला संपूर्ण देश मोदींसोबत उभा आहे. त्यामुळे जर देश मोदींसोबत असेल तर मीसुद्धा त्यांच्यासोबत आहे. मी उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे मी काँग्रेसचा आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Sanjay Singh resigned from party & Rajya Sabha membership