प्रचंड उत्साही अन् प्रभावशाली, शशी थरूर यांनी केलं मोदींचं कौतुक

Shashi Tharoor Praised PM Modi
Shashi Tharoor Praised PM ModiGoogle

जयपूर : काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Modi) तोंडभरून कौतुक केले. उत्तर प्रदेशात भाजपला इतका मोठा विजय (UP Election BJP Victory) मिळेल, असं वाटलं नव्हतं. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचंड उत्साही व्यक्तीमत्व आहे. त्यांच्यामध्ये राजकीयदृष्ट्या काही गोष्टी खूप प्रभावशाली आहेत. ते इतक्या मोठा फरकाने जिंकतील असं वाटलं नव्हतं. पण, मोदींनी ते करून दाखवलं, असं शशी थरूर म्हणाले. ते जयपूर येथे लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

Shashi Tharoor Praised PM Modi
भारतीय क्षेपणास्त्र पडल्यानंतर आम्ही उत्तर दिले असते पण... : पाक PM इम्रान खान

उत्तर प्रदेशच्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्याबाबत बोलताना थरूर म्हणाले, "एक्झिट पोल येईपर्यंत माझ्या मनात एकही प्रश्न नव्हता. बहुतेक लोकांना भाजप आणि समाजवादीमध्ये जोरदार लढत होईल, असं वाटलं. काही लोक समाजवादी पार्टी पुढे असल्याचे सांगत होते. भाजप इतक्या बहुमताने पुन्हा सत्तेत येईल, अशी अनेकांना अपेक्षा नव्हती. समाजवादी पक्षाच्या (एसपी) जागा वाढल्या आहेत आणि त्यामुळे ते चांगला विरोधी पक्ष म्हणून सिद्ध होतील."

जनता भाजपला आश्चर्याचा धक्का देईल -

आज लोकांनी भाजपला जे हवं होतं ते दिलं. पण, एक दिवस मतदार भाजपला आश्चर्याचा धक्का देणार आहे, अशी टीका थरूर यांनी भाजपवर केली. तसेच पंतप्रधान मोदींचं कौतुक तर केलं, पण त्यांच्यावर टीकाही केली. मोदी देशाचं जात आणि धार्मिक या दोन घटकांत विभाजन करत असून हे दुर्दैवी आहे, असंही थरूर म्हणाले.

काँग्रेसच्या पराभवाला जबाबदार कोण? -

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रियंका गांधी वाड्रा यांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी पक्षासाठी दमदार प्रचार केला. पण, विजय मिळू शकला नाही. त्यामुळे काँग्रेसला दोष देता येणार नाही, असंही थरूर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com