देशाला हिंदुराष्ट्र बनविण्याचा भाजपचा घाट; काँग्रेस नेत्यांचा आरोप

वृत्तसंस्था
रविवार, 29 डिसेंबर 2019

कॉंग्रेसमुक्त भारत करण्यासाठी निघालेल्या भाजपला आता स्वतःच देशातून मुक्त होण्याची वेळ आली आहे.

बंगळूर : नागरिकत्व दुरुस्ती कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी अमलात आणून केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने भारताला हिंदुराष्ट्र बनविण्याचा घाट घातल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी येथे केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कॉंग्रेस हा उद्देश सफल होऊ देणार नसल्याचा निर्धार व्यक्त करून केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध उग्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. कॉंग्रेस पक्षाच्या 134 व्या स्थापना दिनानिमित्त येथील फ्रीडम पार्कमध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

घटना व लोकशाहीविरोधी धोरणामुळे देशात जातीय संघर्ष निर्माण होत आहे. याला केंद्र सरकार जबाबदार आहे. या सरकारला चांगला धडा शिकवण्याची गरज असून, त्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

- तोंडी तलाकपीडितांना आर्थिक आणि कायदेशीर मदत जाहीर!

केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध देशात आंदोलन उग्र होत आहे. लोक स्वयंप्रेरणेने केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांविरुद्ध लढा देत आहेत. घटना टिकवा, देश वाचवा अशा घोषणा देत महिला, विद्यार्थी, विविध संघटना, विचारवंत आंदोलनात स्वयंप्रेरणेने भाग घेत आहेत, याचा केंद्र सरकारने विचार करून आपल्या धोरणात आता बदल करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

- पुण्याला तीन मंत्रिपदं? अजित पवारांचे नाव निश्चित; पालकमंत्री कोण?

कॉंग्रेसमुक्त भारत करण्यासाठी निघालेल्या भाजपला आता स्वतःच देशातून मुक्त होण्याची वेळ आली आहे. अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपला चांगली अद्दल घडविल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

माजी उपमुख्यमंत्री डॉ. परमेश्वर म्हणाले, जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीप्रधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेमका उद्देश काय हेच समजत नाही. सीएए, एनआरसी जारी करून हिंदुराष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अत्याचार करण्यात येत आहेत. संपूर्ण जग हे उघड्या डोळ्यांनी पहात आहे.

- कुलदीप यादवसह 'या' खेळाडूची हकालपट्टी; महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन

2014 मध्ये सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला न्याय देण्याचे काम केलेले नाही. युवकांना रोजगार दिलेला नाही. दारिद्य्र निर्मूलनाचा कोणताच कार्यक्रम हाती घेतला नाही. देशाची आर्थिक स्थिती अधोगतीला गेली असल्याचा आरोप त्यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leaders criticized BJP about CAA and NRC bill