राजस्थानमध्ये सुरवातीचा कौल काँग्रेसच्या बाजूने

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

राजस्थानमध्ये शुक्रवारी ७२.३७ टक्के मतदान झाले होते. राजस्थानमध्ये १९९ जागांसाठी २२७४ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण मुख्य लढत काँग्रेस आणि भाजप यांच्यात आहे.

जयपूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत सुरवातीच्या कौलानुसार काँग्रेसला कल मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत आहे. आज (मंगळवार) सकाळी साडेआठपर्यंत काँग्रेस 14 आणि भाजप 7 जागांवर आघाडीवर आहे.

राजस्थानमध्ये शुक्रवारी ७२.३७ टक्के मतदान झाले होते. राजस्थानमध्ये १९९ जागांसाठी २२७४ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण मुख्य लढत काँग्रेस आणि भाजप यांच्यात आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवाय विविध निवडणूकपूर्व सर्वेक्षणांनीही काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचे अंदाज आहेत. 

मतदारराजानं कोणाला आपला कौल दिला आहे. याचा निकाल आज लागत असून, काँग्रेसला अनेकांचा कौल आहे. एक्झिट पोलमध्येही वसुंधरा राजेंचे सरकार जाणार असा अंदाज वर्तविण्यात आला होता.  

एक्झिट पोलचे निकाल :
राजस्थान (जागा : 199 बहुमतासाठी : 100)
भाजप काँग्रेस बसप अन्य 

रिपब्लिक टीव्ही-जन की बात 83-103 81-101 0 15 
न्यूज नेशन 89-93 99-103 0 5-9 
इंडिया टुडे-ऍक्‍सिस माय इंडिया 55-72 110-141 1-3 3-8 
टाइम्स नाऊ-सीएनएक्‍स 85 105 2 7 
 

Web Title: Congress makes lead in Rajasthan assembly election