नाराज नेत्यांना सोनिया गांधी भेटणार; काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीत आणखी काय घडणार?

rahul priyanka sonia
rahul priyanka sonia

नवी दिल्ली : देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने येत्या शनिवारी म्हणजे उद्या एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासहित पक्षातील महत्त्वाचे नेते सामिल होणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीत शेतकरी आंदोलनाबरोबरच काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत नाराज नेत्यांना देखील सामिल होण्यास सांगितलं गेलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून या नाराज नेत्यांनी पक्ष संघटनेमध्ये आवश्यक ते बदल करण्याची मागणी केली होती.

गांधी परिवारासोबत पक्षाच्या महत्त्वाच्या वरिष्ठ असंतुष्ट नेत्यांसोबत होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या नेत्यांसोबत होणारी ही बैठक असंतुष्ट नेत्यांचे समाधान करणारी ठरेल का, हे पाहणं निर्णायक ठरणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या बैठकीच्या आयोजनात महत्त्वाची भुमिका बजावली आहे.

नाराज नेत्यांची समजूत काढण्यासाठीच ही बैठक बोलावली गेली असल्याचा दावा काँग्रेसने खोडून काढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत नाराजीच्या पत्रावर हस्ताक्षर करणारे सगळे 23 नेते सामिल होणार नाहीयेत. यातील 5 ते 6 नेतेच या बैठकीत सामिल होणार आहेत. याशिवाय इतर नेत्यांना देखील बोलावलं गेलं आहे. या बैठकीत जानेवारी-फेब्रुवारीत होणाऱ्या पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत होणाऱ्या चर्चेशिवाय शेतकरी आंदोलनाबाबत देखील पक्षाच्या भुमिकेवर चर्चा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com