esakal | 'ईशान्य भारतातील हिंसाचारास कॉंग्रेस जबाबदार' 
sakal

बोलून बातमी शोधा

Congress misgovernance led to rise of insurgency in north east

नागरी संशोधन विधेयक मंजूर झाल्यानंतर पूर्वेत्तर राज्यात हिंसाचार घडवून आणण्यास कॉंग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज सभागृहात केला. त्यामुळे कॉंग्रेसच्या खासदारांनी सभात्याग करत विधानाचा निषेध केला. 

'ईशान्य भारतातील हिंसाचारास कॉंग्रेस जबाबदार' 

sakal_logo
By
वृत्तसेवा

नवी दिल्ली : नागरी संशोधन विधेयक मंजूर झाल्यानंतर पूर्वेत्तर राज्यात हिंसाचार घडवून आणण्यास कॉंग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज सभागृहात केला. त्यामुळे कॉंग्रेसच्या खासदारांनी सभात्याग करत विधानाचा निषेध केला. दरम्यान, ईशान्य भारतात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन जण मृत्यूमुखी पडले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

लोकसभेत कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पूर्वेत्तर राज्यातील उसळलेल्या हिंसाचाराचा मुद्दा शून्यप्रहरात मांडला. पूर्वेतर राज्याचा काही भाग वगळता सर्वत्र आंदोलनाचा वणवा पेटला आहे, असे चौधरी म्हणाले. इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. काश्‍मीरचाच फॉर्म्यूला पूर्वेत्तर राज्यात राबविला जात असल्याचे चौधरी म्हणाले. काश्‍मीर आणि आसाम हे दोन्ही भाग देशाच्या सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील भाग आहेत. त्यामुळे सरकारने गांभीर्याने हस्तक्षेप करून तेथे शांतता प्रस्थापित करावी. यावर उत्तर देताना संसंदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पूर्वेत्तर राज्यात हिंसाचार भडकवण्याला कॉंग्रेसला जबाबदार धरले. कॉंग्रेसच्या या धोरणाचा जोशी यांनी निषेध केला.

मोबाईल नंबर पोर्ट करायचाय? आता 'हे' आहेत नवीन नियम.. 

जोशींच्या विधानांमुळे संतप्त झालेल कॉंग्रेसचे सदस्य सभागृह सोडून गेले. त्याच वेळी द्रमुकचे खासदारही बाहेर पडले. या दरम्यान शून्य प्रहरात तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी आसाम आणि त्रिपुरातील स्थितीचा मुद्दा मांडला आणि सरकारकडे निवेदनाची मागणी केली. त्यानंतर तृणमूलच्या खासदारांनीही सभात्याग केला.

या मंत्र्यांना मिळणार 'हे' खातं ; अखेर खातेवाटप जाहीर.. 

तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांची 20 ला बैठक 
लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही नागरी संशोधन विधेयक (सीएबी) मंजूर झाल्यानंतर पूर्वेत्तर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यादरम्यान तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्ष खासदार आणि नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. प्रस्तावित बैठक 20 डिसेंबर रोजी होणार आहे.

शरद पवारांच्या आई शारदाबाईही होत्या लढवय्या; वाचा त्यांचा जीवनप्रवास

नागरी संशोधन विधेयक मंजूर झाल्यानंतर आसामसह अन्य पूर्वेत्तर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. त्रिपुरा आणि आसामममध्ये काही ठिकाणी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांनी विधेयकाला विरोध केला आहे. सभागृहात तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी जोरदार विरोध केला. पक्ष सूत्राने दिलेल्या माहितीनुसार राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोरदेखील 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 2021 रोजी पश्‍चिम बंगाल विधानसभेची निवडणूक होत असून, त्यासाठी तृणमूल कॉंग्रेसने प्रशांत किशोर यांना रणनीतीसाठी पाचारण केले आहे.