राहुल गांधींशी नाव जोडले गेलेल्या 'तिचा' होणार विवाह

वृत्तसंस्था
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

आदिती सिंह यांचे लग्न पंजाबमधील काँग्रेस आमदार अंगद सिंह यांच्याशी दिल्लीत 21 नोव्हेंबरला लग्न होत आहे. तर, स्वागत समारंभ 23 नोव्हेंबरला होणार आहे. आदिती सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना याची माहिती दिली. 

रायबरेली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी नाव जोडले गेलेल्या उत्तरप्रदेशातील रायबरेली मतदार संघातील काँग्रेस आमदार आदिती सिंह या लवकरच विवाहबद्ध होत आहेत. पण, त्यांचे लग्न काँग्रेसचेच आमदार अंगद सिंह यांच्याशी होणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

आदिती सिंह यांचे लग्न पंजाबमधील काँग्रेस आमदार अंगद सिंह यांच्याशी दिल्लीत 21 नोव्हेंबरला लग्न होत आहे. तर, स्वागत समारंभ 23 नोव्हेंबरला होणार आहे. आदिती सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना याची माहिती दिली. 

Image may contain: 3 people, beard

आम्हाला कोणी शहाणपणा शिकवू नये; राऊतांचा फडणवीसांना टोला

अंगद आणि आदिती हे दोघेही 2017 मध्ये आमदार झाले होते. दोघांचे कुटुंब राजकारणात असून अंगद सिंग यांनी 2017 मध्ये राजकारणात पाऊल टाकलं. आदिती सिंग उत्तर प्रदेशातील सर्वात तरुण आमदारांपैकी एक आहेत. त्यांनी 2017 मध्ये 90 हजार मतांनी रायबरेलीमधून विजय मिळवला होता. त्यांचे वडील अखिलेश कुमार सिंग पाचवेळा रायबरेलीमधून निवडणूक जिंकले आहेत. राहुल गांधी हे अमेठीचे खासदार असताना त्यांच्याशी त्यांचे नाव जोडले गेले होते. राहुल गांधी यांच्यासोबत साखरपुडा झाल्याच्या अफवा असून ते भाऊ असल्याचंही आदिती सिंग यांनी सांगितले होते.

बाळासाहेबांना अभिवादन करताना फडणवीस म्हणतात, स्वाभिमान जपा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress mla Aditi Singh will marry party colleague Angad Singh