काँग्रेस आमदार व प्रदेश समितीतर्फे राज्यपालांना निवेदन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

गोवा - गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर तसेच विरोधी पक्षनेते चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांच्यासह तेरा काँग्रेस आमदारांनी आज दुपारी 12 वा. राज्यपाल मृदुला सिन्हा यांची दोना पावला येथील राजभवनवर भेट घेतली. काँग्रेस पक्षाचे राज्यात सर्वाधिक आमदार असल्याने सत्ता स्थापनेसाठी संधी देण्याची विनंती केली.

गेल्या वर्षी भाजपकडे सर्वाधिक आमदार नसतानाही सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करण्याची केलेली चूक सुधारण्यास कर्नाटक राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना संधी मिळाली आहे. ती संधी घ्यावी व काँग्रेसला न्याय द्यावा अशी विनंती यावेळी करण्यात आली.

राज्यपालांना काँग्रेसतर्फे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर अभ्यास करण्यासाठी काही वेळ लागणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले. सध्याचे सरकार प्रशासन ठप्प आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत मंत्रिमंडळ बैठका होत नाहीत. तसेच सत्तेतील काही घटक पक्षाचे आमदार व मंत्री या सरकारच्या प्रशासनाला कंटाळलेले आहेत. प्रादेशिक पक्षाचे आमदार काँग्रेसच्या संपर्कात असून, विधानसभेत बहुमत दाखविण्यासाठी संधी दिल्यास बहुमत सिद्ध करू असा दावा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला.

Web Title: The Congress MLA and the Region Committee submitted a memorandum to the Governor