आमदाराने विधानसभा अध्यक्षांना दिला 'फ्लाईंग किस'

वृत्तसंस्था
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

आमदाराने विधानसभा अध्यक्षांना 'फ्लाईंग किस' दिल्याची घटना आज (मंगळवार) घडली. आमदाराच्या 'फ्लाईंग किस'ची चर्चा राज्यात रंगली आहे.

भुवनेश्वर : ओडिशा विधानसभेत काँग्रेस आमदाराने विधानसभा अध्यक्षांना 'फ्लाईंग किस' दिल्याची घटना आज (मंगळवार) घडली. आमदाराच्या 'फ्लाईंग किस'ची चर्चा राज्यात रंगली आहे.

ओडिशा विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. काँग्रेसचे आमदार ताराप्रसाद बाहिनिपती यांनी प्रश्न विचारायची संधी दिल्याबद्दल विधानसभा अध्यक्ष एस. एन. पात्रो यांचे आभार मानताना 'फ्लाईंग किस' दिला. ताराप्रसाद बाहिनिपती यांची कृती पाहून सर्वच अवाक् झाले व हास्यकल्लोळ उडाला. विधानसभेतील वातावरण शांत झाल्यानंतर काही आमदारांनी 'फ्लाईंग किस'वर आक्षेप घेतला.

विधानसभेतून बाहेर आल्यानंतर ताराप्रसाद म्हणाले, 'विधानसभा अध्यक्षांनी माझ्या  मतदारसंघातील मागास जनतेविषयी चिंता व्यक्त केली. पण, सभागृहात 147 सदस्यांमधून प्रथम मला बोलण्याची संधी दिली. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी फ्लाईंग किस केला. अध्यक्षांचा अपमान करण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress mla blows flying kiss to speaker in odisha assembly