सिद्धरामय्यांच्या बैठकीतून काँग्रेसचे तीन आमदार 'गायब' ?

वृत्तसंस्था
बुधवार, 16 मे 2018

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला 104 जागांवर विजय मिळाला. मात्र, काँग्रेसने 78 जागा मिळवत जेडीएसला बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्यानंतर आता सिद्धरामय्या यांनी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीला तीन आमदार अनुपस्थित असल्याचे सांगण्यात आले.

बंगळूरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजप, काँग्रेस-जेडीएसकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख सिद्धरामय्या यांनी काँग्रेसच्या नवनियुक्त आमदारांची बैठक बोलावली. मात्र, या बैठकीला तीन आमदारांनी दांडी मारल्याचे सांगण्यात आले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला 104 जागांवर विजय मिळाला. मात्र, काँग्रेसने 78 जागा मिळवत जेडीएसला बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्यानंतर आता सिद्धरामय्या यांनी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीला तीन आमदार अनुपस्थित असल्याचे सांगण्यात आले. त्यावर सिद्धरामय्या म्हणाले, "काँग्रेसचे सर्व नवनियुक्त आमदार येथे उपस्थित आहे. कोणीही कमी झालेला नाही. सरकार स्थापनेबाबत आम्ही विश्वासू आहोत''. 

या निवडणुकीत भाजपने 104 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, भाजपला बहुमतासाठी आणखी 8 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

दरम्यान, 224 आमदारांची संख्या असलेल्या या विधानसभेत बहुमतासाठी 112 आमदारांची गरज आहे. यासाठी काँग्रेसने जेडीएसला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.  

Web Title: Congress MLA missing from Siddaramaiah meeting