
Om Birla : लोकसभा अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरु; येत्या सोमवारी...
नवी दिल्लीः सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी त्यांचं सदस्यत्व रद्द केलं. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
राहुल गांधी यांना अपात्र ठरवल्यानंतर मागील दोन दिवसांपासून काँग्रेसचं आंदोलन सुरु आहे. ओम बिर्ला यांनी राहुल गांधींबद्दल घेतलेल्या निर्णयाला विरोधकांकडून कडाडून विरोध होतांना दिसून येत आहे. संसदेत याचे पडसाद बघायला मिळत आहेत.
हेही वाचाः जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
ओम बिर्ला यांनी दिलेल्या निर्णयाचा निषेध करत काँग्रेस आणि विरोधी पक्षनेते बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. सोमवार, दि. ३ एप्रिल रोजी लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव येऊ शकतो.
कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर २४ तासांच्या आत राहुल गांधी यांना अपात्र ठरवले. त्यांना त्यांची बाजू मांडण्याची किंवा बोलण्याची संधी न देता आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
दरम्यान, राहुल गांधींना अपात्र ठरवल्यानंतर विरोधकांनी गदारोळ केला होता. त्यांच्या दिशेने कागद फेकण्यात आले होते. त्यानंतर ते सभागृहात आलेच नाही. आज पीव्हीएम रेड्डी यांनी सभागृहाचे कामकाज पाहिले.