मोदी म्हणजे 'गंदी नाली'; काँग्रेस खासदाराची लोकसभेत जीभ घसरली 

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जून 2019

नवी दिल्ली : 'तुम्ही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चोर म्हणत सत्तेत दाखल झाला; आता तुम्हीही संसदेत आहात आणि तेही! आता त्यांना तुम्ही तुरुंगात का टाकत नाही', असा प्रश्‍न विचारत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी आज (सोमवार) लोकसभेमध्ये सत्ताधारी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. 'टूजी आणि कोळसा गैरव्यवहाराच्या प्रकरणांमध्ये अजून कुणालाही अटक होऊन कारवाई का झाली नाही', असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे, भाजपवर टीका करण्याच्या प्रयत्नांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख 'गंदी नाली' असा केल्याने वादंग निर्माण झाला आहे. 

पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर टूजी आणि कोळसा गैरव्यवहार प्रकरणात आरोप केले होते. 'तुमचे सरकार येऊन सहा वर्षे झाली, तरीही तुम्ही कुणालाच अटक केलेली नाही. ठाम सरकार असल्याचा दावा करत असताना सोनिया गांधी आणि राहुल गांधी तुरुंगाच्या बाहेर कसे काय? देशाचा कायदा कडक असावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशीच आमची इच्छा आहे', असे चौधरी यांनी सांगितले. 

याच चर्चेदरम्यान चौधरी यांची जीभ घसरली. ''इंदिरा इज इंडिया' या घोषणेसारखे भाजप सरकार व्यक्तीकेंद्रीत झालेले नाही', अशी टिप्पणी सत्ताधाऱ्यांकडून झाली. त्यावर चौधरी म्हणाले, 'कुणाची तुलना कुणाशी करत आहात? गंगामातेची तुलना तुम्ही घाणेरड्या नाल्याशी करत आहात!'' यावरून प्रचंड गदारोळ झाला आहे. सगळीकडून टीका सुरू झाल्याचे पाहून चौधरी यांनी 'मी हिंदी भाषक नाही; त्यामुळे शब्दांचा अर्थ नीट समजला नाही', अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MP Adhir Ranjan Chaudhari criticizes Narendra Modi