'सरकारने नियमांचे उल्लंघन करत काश्मीरचे तुकडे केले'

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा मुद्दा प्रलंबित आहे. सरकारने रातोरात नियमांचे उल्लंघन करत काश्मीरचे दोन तुकडे केले, असा आरोप काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केला. या वक्तव्यानंतर संसदेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून आज (मंगळवार) लोकसभेत सादर करण्यात आला. सोमवारी जेव्हा यासंदर्भातला प्रस्ताव राज्यसभेत मांडला गेला तेव्हा जसा गदारोळ झाला तसाच काहीसा प्रकार लोकसभेतही पाहण्यास मिळाला. काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी आणि अमित शाह यांच्यात या मुद्द्यावरुन जुंपल्याचे पाहण्यास मिळाले.

अधीररंजन चौधरी म्हणाले, की सरकारने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात असताना निर्णय कसा घेतला, याबाबत स्पष्टीकरण द्यावे. तरीही सरकार म्हणत आहे हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. काँग्रेस पक्ष याच्याविरोधात आहे असा समज पसरविला जात आहे. 

याविषयी उत्तर देताना अमित शहा म्हणाले, की काश्मीरसाठी जीव देण्याचीही तयारी आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर संसदच सर्वोच्च आहे. आमच्या दृष्टीने पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन हे काश्मीरमध्येच येते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MP Adhir Ranjan Chaudhary criticizes BJP in Loksabha