'काश्मीरमधील नेत्यांसोबत प्रत्येक भारतीयाने उभे राहावे'

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

याविषयी ट्विट करत थरूर यांनी म्हटले आहे, की जम्मू काश्मीरमध्ये हे काय होत आहे? या नेत्यांनी काहीही चुकीचे केले नसताना रात्रीतूनच नेत्यांना नजरकैदेत ठेवले जात आहे. काश्मीरमधील नागरिक हे आपले असून, आपण त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्यासोबत उभे राहिले पाहिजे. आपणच त्यांना पाठिंबा देणार नसू तर काहीच राहणार नाही.   

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याने काँग्रेस नेते शशी थरूर यांनी काश्मीरमधील नेत्यांसोबत प्रत्येक भारतीयाने उभे राहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. 

आज होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जम्मू- काश्‍मीर संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. त्याच अनुषंगाने श्रीनगरमध्ये कलम 144 लागू केले आहे. माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मुफ्ती मेहबूबा, नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष उमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवले आहे. जम्मू भागात 30 हजार जवान तैनात केले असून, श्रीनगर विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत.

याविषयी ट्विट करत थरूर यांनी म्हटले आहे, की जम्मू काश्मीरमध्ये हे काय होत आहे? या नेत्यांनी काहीही चुकीचे केले नसताना रात्रीतूनच नेत्यांना नजरकैदेत ठेवले जात आहे. काश्मीरमधील नागरिक हे आपले असून, आपण त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्यासोबत उभे राहिले पाहिजे. आपणच त्यांना पाठिंबा देणार नसू तर काहीच राहणार नाही.   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MP shashi Tharoor Omar Abdullah house arrest statement