'फोटोतला नवरदेव नेमका कोण?' शशी थरूर यांनी दिलं स्पष्टीकरण|Shashi Tharoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shashi Tharoor Reaction on Viral photo with couple

'फोटोतला नवरदेव नेमका कोण?' शशी थरूर यांनी दिलं स्पष्टीकरण

काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Congress MP Shashi Tharoor) नेहमी वेगवेगळ्या कारणांवरून चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे ते प्रचंड ट्रोल झाले होते. त्यांचा नवविवाहीत जोडप्यासोबतचा फोटो चांगलाच व्हायरल (Shashi Tharoor Viral Photo Withn Couple) झाला होता. त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं होतं. या फोटोतील नवरदेव नेमका कोण? असा सवाल नेटकऱ्यांनी केला होता. त्यावरूनच आता शशी थरूर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा: महिला खासदारांसोबतच्या 'त्या' सेल्फीमुळे शशी थरूर ट्रोल; व्यक्त केली दिलगिरी

एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत या फोटोबद्दल थरूर यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, ''या लग्नामध्ये मला आमंत्रित करण्यात आलं होतं. त्या लग्नात सर्व लोकांनी फेटा बांधला होता. फेटा बांधलेला फक्त मी एकटाच नव्हतो. तसेच लग्नातील लोकांनी माझ्या गळ्यात हार घालून माझं स्वागत केलं होतं.''

अभिषेक कुलकर्णी यांचं महाबळेश्वरमध्ये लग्न होतं. या लग्नाला थरूर यांना देखील बोलावण्यात आले होते. त्यांनी ट्विट करून थरूर यांनी लग्नाला उपस्थिती दर्शवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. थरूर एवढ्या लांबून दोन दिवसांसाठी महाबळेश्वरमध्ये आले आणि आमच्या लग्नाचा आनंद घेतला, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

खासदारांसोबतच्या फोटोंमुळे थरूर सापडले होते वादात -

काही दिवसांपूर्वी थरूर यांचा एक सेल्फी वादात आला होता. या सेल्फीवरुन थरूर यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीकाही झाली होती. थरूर यांनी संसदेतील 6 महिला खासदारांसोबत एक सेल्फी पोस्ट केला आणि त्यावर कोण म्हणतं की, लोकसभा काम करण्यासाठी आकर्षक जागा नाही? असं कॅप्शन थरूर यांनी दिलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियावरून प्रचंड टीका करण्यात आली होती.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Shashi Tharoor
loading image
go to top