Loksabha 2019 : ...तर काँग्रेस मेली पाहिजे- योगेंद्र यादव

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मे 2019

मोदींचे आव्हान पेलण्यास काँग्रेस सक्षम नसेल तर काँग्रेस मेलीच पाहिजे असे मत स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.​

नवी दिल्ली : मोदींचे आव्हान पेलण्यास काँग्रेस सक्षम नसेल तर काँग्रेस मेलीच पाहिजे असे मत स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

योगेंद्र यादव म्हणाले की, भाजपला एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळू शकतात, देशात भाजप सरकार येणार असून एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचेही योगेंद्र यादव यांनी सांगितले. काँग्रेस येणाऱ्या काळात राजकारणात भाजपला सक्षम पर्याय ठरू शकत नाही, मग काँग्रेस टिकून काय उपयोग असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

काँग्रेस येणाऱ्या काळात आव्हानांचा सामना करू शकत नसेल ती देशासाठी बाधा असल्याचेही योगेंद्र यादव यांनी म्हटले. म्हणूच काँग्रेस संपली तरच दुसरा पर्याय उभा राहिल. मागील पाच वर्षात खूप मोठ्या अडचणींना देशाला सामोरे जावं लागलं, पण काँग्रेस सक्षम विरोधी पक्षाचे काम करण्यात अपयशी ठरले आहे. काँग्रेसने मागील पाच वर्षात एकही मोठे जनआंदोलन उभारले नाही, मग काँग्रेस हवीच कशाला? असा प्रश्नही योगेंद्र यादव यांनी उपस्थित केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress must die says yogendra yadav