भाजप मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणार अटलजींची भाची

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याविरोधात काँग्रेसने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भाची करुणा शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे. रमण सिंह राजनांदगांव मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवतात. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये करुणा शुक्ला यांना रमण सिंह यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. 

नवी दिल्ली- छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याविरोधात काँग्रेसने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भाची करुणा शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे. रमण सिंह राजनांदगांव मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवतात. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये करुणा शुक्ला यांना रमण सिंह यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. 

रमण सिंह यांच्यासमोर हे कडवं आव्हान मानण्यात येत आहे. करुणा शुक्ला 1993 मध्ये पहिल्यांदा भाजपाच्या तिकीटावर आमदार झाल्या. यानंतर त्यांनी संसदेत जांजगीर मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. गेल्या 4-5 वर्षांपासून त्या सातत्यानं भाजपा नेतृत्त्व आणि रमण सिंह यांच्यावर टीका करत आहेत. भाजपा नेतृत्त्वानं फारसं महत्त्व न दिल्यानं नाराज झालेल्या करुणा शुक्ला यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यातील विधानसभेच्या एकूण 90 जागामधील 18 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्यात 72 जागांसाठी मतदान जाईल. काँग्रेसनं पहिल्या टप्प्यातील 18 जागांपैकी 12 जागांवरील उमेदवार आधीच जाहीर केले होते. यानंतर 6 उमेदवारांची जाहीर काँग्रेसकडून काल (ता.22) जाहीर करण्यात आली.

Web Title: Congress Nominates Atal Bihari Vajpayee's Niece Karuna Shukla to Take on Chhattisgarh CM Raman Singh