काँग्रेस ना दिलवाली ना दलितवाली, केवळ 'डील'वाली - पंतप्रधान मोदी

वृत्तसंस्था
रविवार, 6 मे 2018

"काँग्रेस कधीच दिलवाली नव्हती, ती दलितवालीही नव्हती, ती केवळ डीलवाली होती, जो पक्ष गरिबांचे भले करु शकत नाही त्या पक्षाला हद्दपार करण्याची वेळ आली आहे".

चित्रदुर्ग - "काँग्रेस कधीच दिलवाली नव्हती, ती दलितवालीही नव्हती, ती केवळ डीलवाली होती, जो पक्ष गरिबांचे भले करु शकत नाही त्या पक्षाला हद्दपार करण्याची वेळ आली आहे". असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर केला आहे. चित्रदुर्ग येथील प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते.

काँग्रेसने डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचादेखील अपमान केला आहे. काँग्रेसच्या काळात भारतरत्न हा पुरस्कार केवळ एका घरासाठी राखीव होता, म्हणून त्यांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांना पुरस्कार देण्यात आला नाही, ते काम आम्ही केले. तसेच, दलितांना थोर वीरा मरकडी यांच्याकडून साहस आणि शौर्य शिकण्याची गरज आहे. त्याही दलित समाजातच जन्माला आल्या होत्या. असेही मोदी यावेळी म्हणाले. त्याचबरोबर, काँग्रेस वीरा मरकडी यांची जयंती साजरी करताना कधी दिसत नाही उलट ते मतांसाठी सुलतानाची जयंती साजरी करण्यासाठी पुढे येतात असी टीकाही त्यांनी यावेळी केली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि काँग्रेसदरम्यान एकमेकांवरती आरोपाच्या फैरी झडत आहेत. काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका व्हिडियोच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: congress is not dilwali and not dalitwali said pm modi