काँग्रेसचे निरीक्षक चेल्लाकुमार गोव्यात दाखल

अवित बगळे
गुरुवार, 11 जुलै 2019

पणजी : गोव्यात कॉंग्रेसच्या 15 पैकी 10 आमदारांनी काल (ता. 10) सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कॉंग्रेसने राष्ट्रीय सचिव आणि राज्यप्रभारी डॉ. ए. चेल्लाकुमार यांना गोव्यात पाठवले आहे. पहाटे गोव्यात पोचलेल्या चेल्लाकुमार यांनी प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, रवी नाईक, लुईझिन फालेरो आणि आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स या उर्वरीत पाच आमदाराची भेट घेतली.

चेल्लाकुमार यांनी आज पणजीत पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शरहा यांच्यावर राजकारण हा पैशाचा खेळ केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, भाजप प्रवेशासाठी कोट्यवधी रुपयांची आमिषे दाखवण्याच येत असल्याची माहिती यापूर्वी आमदारांनी दिली होती. मात्र ते एवढ्या तातडीने राज्याचे व पक्षाचे हित नजरेआड करून पक्षांतर करतील असे वाटले नव्हते. आजही कॉंग्रेसचे पाच आमदार विधानसभेत असून ते सरकारला त्यांच्या कृत्याचा जाब जरूर विचारतील.

तत्कालीन विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर हे भाजपमध्ये गेल्याने कॉंग्रेस आपला विधीमंडळ नेता आज निवडेल असे सांगून ते म्हणाले, आमदारांच्या बैठकीत या नेत्याची निवड केल्यानंतर त्याची माहिती विधानसभा सचिवालयाला दिली जाईल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress observer Chellakumar visits Goa