'या' भाजप मुख्यमंत्र्यांना कॉंग्रेसची थेट ऑफर

वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनामुळे आसाममध्ये भडकलेला वणवा शांत होत नाही, तोच आता तेथे नवी राजकीय समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत. आसाम कॉंग्रेसने आज थेट मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर देत भाजप सोडण्याचे आवाहन केले आहे.
 

नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनामुळे आसाममध्ये भडकलेला वणवा शांत होत नाही, तोच आता तेथे नवी राजकीय समीकरणे आकाराला येऊ लागली आहेत. आसाम कॉंग्रेसने आज थेट मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर देत भाजप सोडण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तुम्ही भाजपमधून बाहेर पडा, आपण पर्यायी सरकार स्थापन करू अशी खुली ऑफर त्यांना कॉंग्रेसकडून देण्यात आली आहे. आसामच्या विधिमंडळातील विरोधी पक्ष नेते देवव्रत सैकिया यांनी हे विधान केले आहे, यानंतर राज्यामध्ये स्थापन होणारे सरकार हे नागरिकत्व कायद्याविरोधात आणि भाजपविरोधात असेल असे त्यांनी म्हटले आहे.

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तक प्रकाशनावरून विरोधक आक्रमक

ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे नेते मौलाना बद्रुद्दीन अजमल यांनीही याला पुष्टी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress offers support to Assam CM for new govt if he quits BJP