50 लाखात तरुणीची खरेदी करुन लैंगिक शोषण, काँग्रेस आमदारावर कारवाई

वृत्तसंस्था
बुधवार, 5 जून 2019

गोव्यातील काँग्रेस आमदार अतानासियो मोनसेराते यांना न्यायालयाच्या ट्रायलला सामोरं जावं लागणार आहे. खटला रद्द करण्याची त्यांची याचिका गोव्यातील न्यायालयाने फेटाळली आहे. अतानासियो मोनसेराते यांच्यावर 2016 मध्ये एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. अतानासियो मोनसेराते यांनी आपल्याला 50 लाखात खरेदी करुन लैंगिक शोषण केल्याचा आरोप अल्पवयीन पीडितेने केला होता. लैंगिक शोषण करण्यापूर्वी मुलीला ड्रग सेवन करण्यासाठी जबरदस्ती केल्याचाही आरोप आहे.

पणजी: गोव्यातील काँग्रेस आमदार अतानासियो मोनसेराते यांना न्यायालयाच्या ट्रायलला सामोरं जावं लागणार आहे. खटला रद्द करण्याची त्यांची याचिका गोव्यातील न्यायालयाने फेटाळली आहे. अतानासियो मोनसेराते यांच्यावर 2016 मध्ये एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. अतानासियो मोनसेराते यांनी आपल्याला 50 लाखात खरेदी करुन लैंगिक शोषण केल्याचा आरोप अल्पवयीन पीडितेने केला होता. लैंगिक शोषण करण्यापूर्वी मुलीला ड्रग सेवन करण्यासाठी जबरदस्ती केल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणी अतानासियो मोनसेराते यांच्यावर आता पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई होणार आहे. पण अतानासियो मोनसेराते यांनी सुरुवातीपासूनच आरोप फेटाळले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी गोवा सरकारकडून कट रचला जात जात असल्याचा आरोप अतानासियो मोनसेराते यांनी केला होता. आरोपांनंतर मोनसेराते यांना आठवडाभर तुरुंगात रहावं लागलं होतं. पण नंतर जामिनावर ते बाहेर आले. न्यायालयाच्या आदेशानंतर आता अतानासियो मोनसेराते यांच्यावर 12 जूनला आरोप निश्चित केले जातील.

दरम्यान, अतानासियो मोनसेराते हे पक्ष बदलण्यासाठी ओळखले जातात. एप्रिल 2019 मध्येच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राजकीय कारकीर्दीची सुरुवात युनायटेड गोवा डेमोक्रेटिक पक्षातून सुरु केली होती. 2004 मध्ये अतानासियो मोनसेराते यांनी भाजपात प्रवेश केला, पण 2007 मध्ये पुन्हा घरवापसी केली. काही वर्षांनी ते काँग्रेसमध्ये आले, पण 2015 मध्ये पक्षविरोधी काम केल्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. यानंतर त्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Panaji MLA Babush Monserrate to face trial for alleged rape