काँग्रेसकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे 'लॉलीपॉप' : पंतप्रधान

वृत्तसंस्था
शनिवार, 29 डिसेंबर 2018

काँग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे 'लॉलीपॉप' देण्यात आले.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नवी दिल्ली : काँग्रेसने लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले. मात्र, त्यापैकी फक्त 800 शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. काँग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे 'लॉलीपॉप' देण्यात आले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) काँग्रेसवर निशाणा साधला. 

नुकत्याच झालेल्या मध्यप्रदेश, राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी हे वक्तव्य केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे लॉलीपॉप देण्यात आले.

दरम्यान, काँग्रेसवर निशाणा साधताना ते म्हणाले, काँग्रेसने लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले. मात्र, आतापर्यंत फक्त 800 शेतकऱ्यांना याचा फायदा झाला.

Web Title: Congress Party Farmer Loan waiver promise was a lollypop says Narendra Modi