काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी;प्रियांका गांधी यांची ग्वाही

काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी;प्रियांका गांधी यांची ग्वाही

नवी दिल्ली - नव्या कृषी कायद्यांविरोधात जंतरमंतरवर ३२ दिवसांपासून धरणे आंदोलन करणाऱ्या काँग्रेस खासदारांची सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज भेट घेतली. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी हे खासदार आंदोलन करत आहेत. काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही प्रियांका यांनी यावेळी दिली. दुसरीकडे राहुल गांधी यांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा देणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे म्हटले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संसदेत संमत झालेल्या कृषी कायद्यांविरुद्ध काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असून याआधी पंजाबमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. राष्ट्रपतींकडेही या कायद्यांविरोधात दाद मागण्यात आली होती. आताही पक्षाचे पंजाबमधील खासदार आणि काही आमदारही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि सरकारदरम्यान वाटाघाटींच्या आठव्या फेरीला प्रारंभ होण्याआधी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींनी आज या लोकप्रतिनिधींची भेट घेतली. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मोदी सरकारने भांडवलदार मित्रांच्या फायद्यासाठी देशातील अन्नदात्यांचा विश्वासघात केला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपले म्हणणे मांडले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देणे सर्वांचे कर्तव्य आहे. 
- राहुल गांधी, नेते काँग्रेस 

आंदोलक शेतकरी कोणत्याही स्थितीमध्ये मोदी सरकारसमोर मान तुकवणार नाहीत. 
- कॅ. अमरिंदरसिंग, मुख्यमंत्री पंजाब 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com