महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेस एकवटली; राहुल गांधी करणार दिल्लीत 'हल्लाबोल' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi

महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेस एकवटली; राहुल गांधी करणार दिल्लीत 'हल्लाबोल'

काँग्रेस कडून रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर राहूल गांधीयांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विरोधात 'महागाई वर हल्ला बोल' रॅली काढण्यात येणार आहे. यामध्ये बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी बाबतही सरकारला घेरले जाणार आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने सांगितले की, मुख्यालयातून सकाळी 9 वाजता बसेस धावण्यास सुरुवात होईल.

काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते सकाळी 10 वाजता पक्ष मुख्यालयातून बसमध्ये बसून रामलीला मैदानाकडे रवाना होतील. याच बसमधून राहुल गांधीही रॅलीला जाऊ शकतात. या रॅलीला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर पक्षाचे नेते संबोधित करणार आहेत. यात देशाच्या इतर राज्यातील पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

कन्याकुमारी ते काश्मीर 7 सप्टेंबरपासून 3,500 किलोमीटरच्या 'भारत जोडो यात्रे'च्या अगोदर ही रॅली काढण्यात आली आहे. जिथे राहुल गांधी महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर भर देण्यासाठी आणि जातीय सलोखा वाढवण्यासाठी भारतात प्रवास करतील.

'भारत जोडो यात्रा' हा काँग्रेस पक्षाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा जनसंपर्क कार्यक्रम आहे, ज्यामध्ये पक्षाचे नेते तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतील. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपचारासाठी देशाबाहेर गेल्या असून पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी याही त्यांच्यासोबत गेल्या आहेत. यामुळे दोघेही कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. दरम्यान, पक्ष सोडल्यानंतर, माजी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद हे देखील रविवारी जम्मूतील सैनिक फार्म्स येथे त्यांच्या पहिल्या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

Web Title: Congress Party Organising Mehangai Halla Bol Rally Ramlila Maidan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..