काँग्रेसची कामगिरी विराटच्या संघासारखी : चिदंबरम

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीम विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ज्याप्रमाणे कसोटी मालिका जिंकतो. त्याचप्रकारे कर्नाटकात काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडीने 4-1 अशी कामगिरी करुन दाखवली. या निकालामुळे आघाडीचा उद्देश यशस्वी झाला, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी ट्विटरवरून सांगितले.  

कर्नाटकात लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीचा निकाल आज (मंगळवार) जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत भाजप पिछाडीवर असून, काँग्रेस-जेडीएस आघाडीला मोठे यश मिळाले आहे. बल्लारी लोकसभा मतदारसंघ आणि जामखांडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांचा विजय झाला आहे. तसेच मांडया लोकसभा आणि रामानागारा विधानसभा मतदारसंघातून जेडीएसचे उमेवार विजयी झाले आहेत. 

दरम्यान, रामानगरम विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता कुमारस्वामी एक लाख 9 हजार 137 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार 15 हजार 906 मते मिळाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress performance is similar to Virat Team says P Chidambaram